Home
Home Breaking News वालुर येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

वालुर येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

 

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी

वालुर येथील माळी गल्ली येथे श्री.संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षी उत्साहात भव्य दिव्य आयोजन श्री.संत सावता माळी भजनी मंडळ व श्री.संत सावता माळी मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजन करण्यात येते.याहि वर्षी श्री.संत सावता माळी यांच्या 729 व्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन दि.27 जुलै शनिवार ते 3आॕगस्ट शनिवार दरम्यान करण्यात आले आहे.या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी 4ते 6काकडा भजन,7ते10ज्ञानेश्वरी पारायण,11 ते 1 गाथा भजन,6 ते 7.30 हरीपाठ 9 ते 11 हरि किर्तन व नंतर जागराचे आयोजन करण्यात आले आहे.या अखंड हरिनाम सप्ताहात दि.27 जुलै शनिवार रोजी 9ते 11 हे.भ.प. प्रकाश महाराज साखरे यांचे हरी किर्तन तर दि.28 जुलै रविवार रोजी ह.भ.प.सचिन महाराज लावणीकर,दि.29 जुलै सोमवार रोजी ह.भ.प.नाना महाराज गोफणे,दि.30 जुलै मंगळवार रोजी ह.भ.प.महादेव महाराज राऊत बिड,दि.31जुलै बुधवार रोजी ह.भ.प.पंकज महाराज थोरे देवनांद्रा दि.1 आॕगस्ट गुरुवार रोजी ह.भ.प.कॄष्णा महाराज नवले पैठण ,दि.2आॕगस्ट शुक्रवार रोजी ह.भ.प.1008 महामंडलेश्वर मनिषानंद पुरी महाराज रुढी पाटी यांचे हरीकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तर दि.3 आॕगस्ट शनिवार रोजी सकाळी 8 वाजता श्री.संत सावता महाराज यांच्या पालखिची मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी 11 ते 1 या वेळेत ह.भ.प.मरमपुज्य , परमहंस श्री.1008स्वामि हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेडकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.संत सावता भजनी मंडळ व श्री.संत सावता मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here