स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी येथे पुरातन मंदिराचे जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा*

 

लोकदर्शन मुंबई प्रतिनिधी:👉 महेश कदम

मुंबई प्रभादेवी येथील स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी येथे पुरातन स्वयंभु शिव शंकर मंदिर/ शिव लिंग मंदिराचे सकाळी ठिक ७:०० वाजता जिर्णोद्धार करण्यात आला. पुरातन स्वयंभु हनुमान मंदिर पंचधातु कलश स्थापना करण्यात आले. व श्री. साईनाथ मुर्ती ह्यांची देखील स्थापना करण्यात आली तसेच श्री. स्वामी समर्थ मुर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सुंदर सुबक मठात रुपांतर झाले. सकाळी ठिक ७:०० वाजता ब्रह्मवृंद श्री. मणेरीकर गुरुजी यांच्या सह ९ ब्राह्मणांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात सर्व सभासद भक्त यांच्या उपस्थित श्रमसाफल्य मंडळ अध्यक्ष प्रकाश नवलु सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व मान्यवर या सर्वांच्या सहकार्याने वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक, मुर्ती देणगीदार या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. स्वराज्य गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष संतोष शिवतरकर, संतोष माडकर, अनिल राणे, दत्ताराम गराटे संस्थेचे पदाधिकारी व सोसायटीतील रहिवासी मोठ्या संख्येतेने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यजमान म्हणून श्री व सौ. आरती दत्ताराम गराटे होते. सदर हवन करीता एकुण ११ जोडपे सहयजमान उपस्थित होते.
जल अभिषेक, गंगा, गिरनारी, कमंडलु जल, नर्मदानदी जल, कृष्णा नदी जल, काशी जल, या संपूर्ण जलाने अभिषेक केल्या नंतर धनधान्य विधी, त्यानंतर निद्रा विधी, कलश स्थापना, होम हवन सह कार्यक्रम गतीमय वातावरणात साजरा झाला. तसेच पुजा विधी झाल्यावर सर्वांना प्रसादाचा लाभ रहिवासी भाविक ह्यांना देण्यात आले. स्वामींचे मूर्तीकार विश्वंभर साळसकर ह्यांनी ही सुंदर मुर्तीचे उभारणी केली. विशेष सहकार्य श्री. नरेंद्र तानावडे साहेब ह्यांनी देणगी उपलब्ध करून दिले. विशेष आभार ह्या मंदिरासाठी दिवस-रात्र मेहनत श्री. दीपक दळवी ह्यांनी घेतली म्हणून सर्व कार्यक्रम आनंदात पार पडले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *