नागरिक विरंगुळा संस्था यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था, भाईंदर, पूर्व यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात १४ एप्रिल रोजी संस्थेचे कार्यालय मिरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्र. १३ नवघर, मैदान येथे साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शंकर जंगम, सरचिटणीस गंगाराम पवार, खजिनदार सुधिर परब, महिला सदस्य लता जाधव या उपस्थित होत्या. ज्येष्ठ नागरिक संस्थेतील इतर सदस्य ही बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सौ शुभांगी गादेगावकर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन वृत्तांत व त्यांचे सामाजिक कार्य यावर एक छोटासा प्रकाशझोत टाकत डॉ. सौ शुभांगी गादेगावकर यांनी वक्तव्य केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला आपल्या दैनंदिन जीवनात दिलेले महत्त्व स्पष्ट केले त्याचप्रमाणे स्त्रिया, मजूर, कामगार यांच्या हक्कांचे संवर्धन करण्यासाठी आंबेडकरांनी केलेले प्रयत्न स्पष्ट केले. या महापुरुषाकडून आपणही शिकले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. शुभांगी गादेगावकर यांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here