गडचांदूर येथील ऐतिहासीक बुद्ध भूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ ला सकाळी ७:३० पासून ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे मुख्य विहारात आदरणीय भंते कश्यप यांनी बुद्ध पुजा पाठ घेतला, भंते कश्यप यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नियमित बुद्ध वंदनेला येत असताना मधातच रस्त्यावर हृदयविकाराचा धक्का बसला व त्यात पुर्ण बरे झाल्यावर बुद्धभूमीला भेट दिलेले देवरावजी भगत , व नियमितपणे बुद्ध वंदनाला येणारे नामदेवराव लांडगे यांच्या हस्ते तथागत बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचा सत्कार म्हणून पुष्पहार अर्पण करण्याची संधी देण्यात आली. तदनंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सदर कार्यक्रमास भंते कश्यप, रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे, गौतम भसारकर, प्रभाकर खाडे, देवराव भगत, नामदेव लांडगे, गौतम पथाडे, ईश्वर रामटेके, धोंगडे, रवि ताकसांडे, प्रेम वानखेडे, पत्रुजी दुर्गे, आशिल निरंजने, गजानन वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

तसेच सिद्धार्थ विहार गडचांदूर भीम बौद्ध मंडळाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंडळाच्या अध्यक्षा पौर्णिमा अशोककुमार उमरे यांनी धम्म ध्वजारोहण केल्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here