अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडचे किशोरी मुलींच्या आरोग्याकरिता विशेष उपक्रम

By :  प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे एका मागे एक विशेष उपक्रम राबवत आहेत. त्यात गावाच्या विकासाच्या चारीही बाजूने विचार केला जात आहे. यावेळेस माणिकगड च्या सी. एस. आर. टीम ने आजूबाजूच्या एकूण 6 गांवातील 105 किशोरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप व मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केलेत. या 6 गावामध्ये मानोली, बैलमपूर, जामणी, नोकारी, गोवारीगुडा व बॉम्बेझरी यांचा समावेश होता.या उपक्रमाला गांवतील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, आशा वर्कर व महिलांची मदत मिळाली. या उपक्रमामुळे किशोरी मुलींच्या मासिक पाळी आरोग्य व त्याची काळजी घेण्याची माहिती त्यांना मिळाली असे प्रतिपादन गांवतील महिलांनी केलेत. व किशोरी मुलींनी त्याबद्दल माणिकगडचे आभार व्यक्त केलेत. या उपक्रमपला यशस्वी करण्यास माणिकगड च्या सी. एस.आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here