‘राजकारण गेलं मिशीत’ चित्रपटात आभिनेत्री रेशमा राठोड यांची झलक

लोकदर्शन :  स्नेहा उत्तम मडावी

सध्या चालू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणारा जेष्ठ ग्रामीण लेखक रा रं बोराडे ह्यांच्या ” अग अग मिशी ” ह्या कथेवर आधारीत “राजकारण गेलं मिशीत” हा बकुळी क्रिएशनची निर्मिती असलेला आणि मकरंद अनासपुरे यांचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला चित्रपट येत्या १९ एप्रिल पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये प्रेक्षकांना मनसोक्त हसवून विचार करायला लावणारा हा एक सुंदर मार्मिक सिनेमा आहे. या अगोदर मकरंद अनासपुरे यांचे राजकीय पार्श्वभूमी असलेले “खुर्ची सम्राट”, “गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा”, “पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा” यासारखे राजकीय विनोदी चित्रपट अतिशय गाजले. तसाच उत्कृष्ट प्रतिसाद याही चित्रपटाला मिळेल याची खात्री मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या टीमने व्यक्त केलेली आहे. या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने असून छाया दिग्दर्शक सुरेश देशमाने, संगीत अतुल दिवे, कथाविस्तार योगेश शिरसाठ, सुमित तौर, पटकथा संवाद योगेश शिरसाठ, संकलन अनंत कामथ आहेत तर कलाकार मकरंद अनासपुरे सोबत प्राजक्ता हणमघर, रेश्मा राठोड ,प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ राजू सोनावणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनित भोंडे, हरीश तिवारी, छोटू विठ्ठल, श्वेता पारखे, उनती कांबळे, सुनील डोंगर, शैलेश रोकडे, आहेत तर येत्या १९ एप्रिलला बघायला विसरू नका “राजकारण गेलं मिशीत”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here