बार्ली येथे चिंच बार्ली येथे यात्रा मोठया उत्साहात जल्लोषात साजरी केली जाते

लोकदर्शन मुंबई.👉सुनिल ज्ञानदेव भोसले 9146241956

श्रीवर्धन तालुक्यातील बार्ली पंचतन येथे श्री चिंचबादेवी मोठे जागृत स्थान आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री चिंचबादेवीचा होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रविवार दिनांक २५/३/२०२४ रोजी एक गाव एक होळी निमित्त होईल प्रज्वलताचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सोमवार दिनांक २६/३/२०२४ रोजी देवीची पालखी मिरवणूक सकाळी ठीक ५:४५ वा मूळ मंदिरातून काढण्यात आली सदर मिरवणूक देवीच्या सानेवर मंगळवार दिनांक २७/३/२०२४ रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न झाली सदर देवीच्या उत्साहानिमित्ताला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या रात्री जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच दुसऱ्या दिवशी अखंड आगरी समाज खोती नंबर ३ तर्फे ‘संभा तुझं सौभाग्य’तिसऱ्या रात्री कुंभार समाज बोलली पंचतंतर्फे रेशीमगाठी या जन्माच्या चौथ्या रात्री श्री चिंचबादेवी स्थान तर्फ ‘उसनी बायको पाहिजे’हा नाट्यप्रयोग तसेच पाचव्या रात्री अखंड आगरी समाज तर्फे म्हशाचे सोंग तसेच शेवटच्या दिवशी सायंकाळी ठीक ७ वाजता चिंचबादेवी निरोप पालखी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात झाले होते सदर कार्यक्रमाकरिता भाविकांची मोठा प्रमाणात गर्दी होत असते.लेखक श्री. ऋश्रीकांत गायकर छायाचित्रीकरण . मनाली सदरे पुजारी . दिनेश गायकर
संकल्पना मंदार सदरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here