संपादिका सौ.किरण वाघ यांना आंतरराष्ट्रीय दर्जेचा साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

संपादिका सौ.किरण वाघ यांना आंतरराष्ट्रीय दर्जेचा साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तालुक्यात आपल्या पत्रकारितेचा आगळा वेगळा ठसा उठावीत सामाजिक शैक्षणिक राजकीय असे विविध क्षेत्रात निर्भीड आणि पक्ष पत्रकारिता करून आपला नाव लौकिक करणाऱ्या सौ किरण संजय वाघ यांना आंतरराष्ट्रीय दर्जेचा साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दरवर्षीओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन राज्यात राजकीय सामाजिक पत्रकारिता आणि शैक्षणिक विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते दिनांक ३ मे रोजी साईबाबाची नगरी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ देऊळगाव राजा तालुक्यातील पत्रकार तथा संपादिका किरण संजय वाघ यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपले नाव लौकिक करत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना साई कलारत्न समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप : एक फुटाची भव्य व दिव्य ट्रॉफी, एक सोनेरी मेडल, कोल्हापूरी फेटा, एक साई चे नाव ओम साई लिहीलेली भगव्या रंगाची शाल, सन्मानपत्र, गुलाब पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here