प्रा दिनकर झाडे राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्काराने सन्मानित ——————

लोकदर्शन गडचांदूर👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर व यशवंतराव चव्हाण सेंटर , केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्याच्या निमित्ताने “जागर मराठीचा” या समारंभाच्या पहिल्या सत्रात ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024’ आणि दुसऱ्या सत्रात ‘राज्यस्तरीय कवी संमेलन व काव्यभूषण पुरस्कार वितरण सोहळा’ 27 फेब्रुवारी ला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट इमारत, ए.आर.डी. सिनेमा हॉलच्या मागे, मलकापूर रोड, बुलढाणा. येथे मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.
सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूरयेथे कार्यरत कनिष्ठ व्याख्याता प्रा. दिनकर के. झाडे यांना मराठी शिलेदार संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थाप्रमुख सन्माननीय राहुल पाटील सर व मान्यवरांच्या हस्ते यांच्या साहित्य क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुष्पगुच्छ , जागर मराठीचा विशेषांक, मानपत्र , व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या हातून अधिक दर्जेदार लेखन होवो, अशी अपेक्षा करून पुढील काव्य वाटचालीस भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात कवीसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कविवर्य व साहित्यिक . अजीम नवाज राही,, संस्थाप्रमुख राहुल पाटील , कार्यक्रमाध्यक्ष रमेश इंगळे, स्वागताध्यक्ष . राधेश्याम चांडक , मुख्य आयोजक व सचिव . नरेश शेळके बुलढाणा तसेच माननीय वैशालीताई उत्तमराव अंडरस्कर , . पल्लवीताई पाटील , . तारकाताई रुखमोडे , .सुधाताई मेश्राम , संग्रामदादा कुमठेकर, , विष्णू दादा संकपाळ अरविंद दादा उरकुडे , उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी संपादकB मा.सविताताई पाटील ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्श प्रशांत दादा ठाकरे सिलवासा यांनी केले.
**************************

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *