नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– येल्लो मोझॅक व विविध किड, रोगप्रादुर्भावामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसुलमंत्री आणि संबंधित विभागांना निवेदन पाठवून जिल्हातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या गंभीर अस्मानी संकटाची योग्य दखल घेऊन हेक्टरी १ लाख रुपये मदत करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी केलेली आहे. मात्र अनेक दिवस होऊनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही ठोस शासकीय मदत शासनाने जाहीर केलेली नाही. जिल्हात एकूण ३७ हजार हेक्टर च्या वर सोयाबीन पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना, गोडपिपरी, जिवती, पोंभुर्णा तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सोयाबीन पीक घेतले जाते. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पीकांवर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त होऊनही शासनाकडून केवळ शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली जात आहे आणि वेळ मारून नेली जात आहे. यामुळे शेतकर्‍यांची धाकधुक आनखी वाढली आहे.
शासकीय मदतीसाठी जिल्हातील शेतकरी आक्रोश करीत असताना राज्याच्या महसूलमंत्रींनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना जिल्हात बोलावून या रोग प्रदुर्भावाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असे सांगितले. तसेच जिल्ह्याधिकराऱ्यांनी सुद्धा काही भागात पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत ठोस घोषणा केलेली नसून शेतकर्‍यांची दिवाळी गोड होईल की नाही याबाबत शेतकरी चिंतेने ग्रस्त आहेत. आता तरी मायबाप सरकार शेतकर्‍यांचा हंबरडा ऐकून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडे केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *