महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर येथे गांधी – शास्त्री जयंती साजरी. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदुर: 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर येथे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा चे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे ,होत्या ,तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव धनंजय गोरे, शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक भिमस्वरुप हस्ते, पर्यवेक्षक शंकरराव तुराणकर , उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते.
पुर्व माध्यमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागवार विद्यार्थ्यानी उस्फुर्त असे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर मराठी व इंग्रजी भाषेतून प्रकाश टाकला. संचालन प्रा आरजू आगलावे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा सुधीर थीपे यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here