आदरणीय डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान मोहीम. .!*

 

लोकदर्शन सिंधुदुर्ग👉 (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

आदरणीय डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. याचीच दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आदरणीय डॉ.श्री.दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले. आणि आता भारत सरकारचा पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शरीरासारखे यंत्र आणखी कोणतेही नाही या मुल मंत्राप्रमाणे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर स्वच्छता गरजेची आहे. यासाठी आदरणीय डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण राज्यभर स्वच्छतेचा जागर करत आहेत. याचेच उदाहरण म्हणून २३ डिसेंबर २०१३ रोजी डॉ.डी.वाय.पाटील स्टेडीयम झालेल्या भव्य आरोग्य जागरुकता शिबीराची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली.
एक पाउल स्वच्छतेकडे या गांधीजींच्या विचारसरणी नुसार गांधी जयंती निमित्त आदरणीय डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाने हाती घेतलेल्या देशव्यापी स्वच्छता अभियान कार्यक्रम आज दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजल्या पासून संपूर्ण भारत भर राबविण्यात आला. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तहसिलदार कार्यालय मालवण ते माघी गणेश मंदीर दुतर्फा रस्ता, ता.मालवण, दाभोली नाका ते वेंगुर्ला बसस्थानक रस्ता, ता.वेंगुर्ला , सुकळवाड बाजारपेठ, ता.मालवण, पिंगुळी म्हापसेकर तिठा ते पिंगुळी रेल्वे ब्रिज दुतर्फा रस्ता, ता.कुडाळ, श्रीदत्त मंदीर, मु.पो.कोकिसरे, खांबलवाडी,ता.वैभववाडी, तळेरे ग्रामपंचायत कार्यालय परिसर, ता.कणकवली, लोरे नं.01 स्मशानभूमी,ता.कणकवली, लघु पाटबंधारे कार्यालय जानवली, ता.कणकवली, कासार्डे हायस्कूल परिसर,ता.कणकवली, हळवल स्मशानभूमी,ता.कणकवली, चिपी ग्रामपंचायत रोड, ता.कुडाळ, सावंतवाडी-बेळगांव रोड दुतर्फा, ता.सावंतवाडी, बांदा बाजारपेठ , ता.सावंतवाडी, स्मशानभूमी कुवळे, ता.देवगड, नारिंग्रे स्मशानभूमी, ता.देवगड, सरकारी ग्रामीण रूग्णालय, ता.देवगड, या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत या 16 ठिकाणावर एकूण 877 श्रीसदस्य उपस्थित होते व अंदाजित 72 टन किलोग्राम कचरा संग्रहित करून 27800 चौ.मी. परिसर व 15 कि.मी. दुतर्फा रस्ता पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
या कार्यामागे साहजिकच आदरणीय ज्येष्ठ निरुपणकर डॉ.श्री.आपासाहेब धर्माधिकारी व श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *