कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – महेंद्र घरत.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 28 उरण मधील प्रत्येक CFS, कंपनी मध्ये प्रकल्पांमध्ये स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे. नोकरी मिळालेच पाहिजे. नोकरी हा स्थानिक भूमीपुत्रांचा अधिकार, हक्क आहे. कामगारांवर कोणी अन्याय करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. उरण तालुक्यातील भेंडवळ येथील पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी.डब्लू. सी )कंपनीने येथील स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय केला आहे.मात्र कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी भेंडखळ येथील पोलारीस लॉजिस्टिक पार्क कंपनीला ठणकावून सांगितले.

 

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्‌दीतील कार्यरत असणा-या पोलारीस लॉजिस्टिक पार्क (सी डब्ल्यु.सी) कंपनीने येथील स्थानीक भूमीपुत्र असलेल्या कामगारांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ तसेच कामगारांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने हुकूमशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करणाऱ्या पोलारीस लॉजिस्टीक पार्क (सी.डब्लू.सी) कंपनी प्रशासन विरोधात रायगड श्रमिक संघटना, न्यू मेरिटाईम अँण्ड जनरल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली सी डब्लू सी लॉजिस्टीक पार्क नोकरी बचाव कामगार समिती भेंडखळच्या माध्यमातून कामगारांनी सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे.सदर साखळी उपोषणाला सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.साखळी उपोषणाचा दिनांक 28/2/2023 रोजी दुसरा दिवस असून या उपोषणाला जाहीर पाठिंबा देऊन महेंद्र घरत यांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला.

यावेळी कामगार नेते महेंद्र घरत यांनी कंपनी प्रशासना आवाहन केले की कामगारांना न्याय दया. स्थानिक भूमीपुत्र असलेल्या येथील कामगारांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने कंपनीला दिलेली आहे. कामगारांच्या पोटावर पाय देऊ नका. कमी पगारात कामगार काम करू शकत नाही.त्यांच्या मागण्या पूर्ण करा असे महेंद्र घरत यांनी कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.या साखळी उपोषणाला भेंडखळ ग्रामपंचायतने जाहीर पाठिंबा दिला आहे.कामगार नेते भूषण पाटील,
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख अतुल भगत, जेष्ठ साहित्यिक एल. बी.पाटील, कामगार नेते महादेव घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार तसेच आजूबाजूच्या गावातील ज्येष्ठ मान्यवरांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपला जाहीर पाठीबा दिला.

कामगारांच्या मागण्या खालीलप्रमाणे:-

जो जुना पगार चालू होता तो पगार कामगारांना दर सहा-सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत जुन्या पगाराची बरोबरी करावी व जुन्या पद्धतीने कामगार बदली नियम चालू ठेवावा. तसेच उर्वरित राहिलेल्या स्थानिक कामगारांना काही कालावधीमध्ये समाविष्ट करून घेणे.अशी कामगारांची मागणी आहे.कामगारांना जुना पगार 32000 ते 40,000 पर्यंत पगार होता. आता पोलारीस कंपनीने नव्याने कारभार करायला घेतल्याने 15 वर्षे जुने असलेल्या कामगारांना 12000 रुपये सध्या कंपनी प्रशासन पगार देणार आहे.12000 पगारात आजच्या महागाईच्या काळात घर दार संसार चालवीने अवघड आहे. त्यामुळे जुना पगार द्यावा टप्प्या टप्प्याने द्यावा अशी कामगारांची मागणी आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *