आरोग्य सेवेतील सामजिक कार्यासाठी डॉ. कुलभूषण मोरे सन्मानित* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, अर्थ फाउंडेशन तर्फे अतिदुर्गम भागात करत आहेत विविध आरोग्य जनजागृति उपक्रम

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील उपरवाही येथे अखिल भारतीय मादिगा समाज संघटने तर्फे भव्य शिवजयंती तथा संत शिरोमणि रविदास महाराज जयंती संयुक्त महोत्सव तथा समाज प्रबोधन मेंळावाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी अर्थ फाउंडेशन चे संचालक समाजसेवक डॉ. कुलभूषण मोरे यांचा सत्कार करण्यात आला . डॉक्टर मोरे यांनी अतिदुर्गम जीवति व कोरपणा तालुक्यात विविध आरोग्य संबंधित उपक्रमा द्वारे जनजागृती तसेच मोफत आरोग्य शिबिर उपक्रम राबविलेले आहेत तसेच विविध सामाजिक विषयावर प्रबोधन सेवा देत आहेत या कार्याकरिता त्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गीता ताई सिडाम (सरपंच )कौरासे (उपसरपंच) , जिल्हाध्यक्ष पेडपल्लिवार , प्रदेशाध्यक्ष त्रिशुलवार , प्रेम जर्पोतवार (युवा वक्ते) , नाथूजी नगराळे (कवी) उपस्थित होते . या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ कुलभूषण मोरे यानी शिवचरित्र तसेच समाज प्रबोधन या विषयावर मार्गदर्शन केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here