मराठा रायडर क्रिकेट क्लब च्या वतीने 10 ग्रामपंचायत ला नेबुलायझर मशीन चे वाटप

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर :-गडचांदुर येथील कला,क्रीडा व सांस्कृतिक संस्था मराठा रायडर क्रिकेट क्लब च्या वतीने नुकतेच क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये गडचांदुर शहरातील क्रीडाप्रेमी,व काही समाजसेवकांनी भरभरून मदत वेगवेगळ्या स्वरूपात केली होती त्यातून जो काही निधी शिल्लक राहिला होता,त्यातून सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे त्रस्त 10 गावांना जिथे आरोग्य सुविधांचा अभाव असतो तत्काळ सुविधा मिळत नाही अशा गावांना एक सामाजिक दायित्व म्हणुन नेबुलायझर(वाफारा मशीन)चे वाटप शिवजयंती चे औचित्य साधून करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष सविताताई टेकाम,नगरसेवक अरविंद डोहे, विक्रम येरणे,मीनाक्षी एकरे,किरण अहिरकर, वैशाली गोरे,हंसराज चौधरी, सचिन भोयर, आशिष देरकर, डॉ पंकज देरकर,डॉ प्रवीण लोनगाडगे ,मनोज भोजेकर, सदानंद गिरी,शैलेश लोखंडे,श्रीनिवास पवार,निखिल एकरे,वैभव राव,विशाल राव,वैभव गोरे,प्रणय पानघाटे, तथा इतर उपस्थित होते,
मराठा रायडर क्रिकेट क्लब च्या या स्तुत्य उपक्रम चे सर्वत्र कौतुक केले जाते आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here