लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे
. या परीक्षेकरिता विद्यालयातील बारा(१२) विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी नऊ(९) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी अभिनंदन केले. तसेच सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अडबाले , व सचिव बोबडे यांचे सह सर्व संचालक मंडळांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले.
विद्यालयाचे पर्यवेक्षक गाडगे सेवाजेष्ठ शिक्षक ताकसांडे ,तसेच मार्गदर्शक शिक्षक पाटील यांचे सह सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून येणाऱ्या काळात स्पर्धेत सहभागी व्हावे व जिद्द बाळगावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
,