लोणी येथे RO मशीनचे लोकार्पण 

by : Satish Musle

कोरपणा :

लोणी येथे तत्कालीन आमदार संजय धोटे यांच्या मागणीच्या अनुषंगाने तात्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या खनिज विकास निधीमधुन पाणी शुध्दिकरण संयंत्र (आरओ मशीन) मंजुर करण्यात आले होते. सदर काम हे नुकतेच पुर्ण झाले असुन त्याचे लोकार्पण लोणी येथिल सरपंच रिपीका येलपुलवार व उपसरपंच अविनाश वाभिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पाणी शुध्दिकरण संयंत्रामुळे गावात शुध्द पाण्याची सोय निर्माण झाली आहे.
यावेळी लोकार्पण सोहळ्याला सतिश मुसळे, ग्राम पंचायत सदस्य सोनु भोंगळे,विणा काकडे, कुणाल कुडमेथे, ज्योती डाखरे,प्रमोद डंभारे,दवंडे पाटिल,कर्मचारी गोवर्धन बोधे काशिनाथ शिंदे यांचे सह गावातील बहुतांश गणमान्य नागरिक उपस्थित होते.

#loni #satishmusle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here