शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : अवघ्या तीन तासात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु अजय धोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री राम मंदिर राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये अवघ्या तीन तासांच्या आत ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे राजुरा शहर युवक कॉंग्रेसतर्फे शिशू किट चे वितरण, युवक काँग्रेसच्या विविध शाखेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक चे वितरण करण्यात आले तर काही ठिकाणी हळदी कुंकू चे कार्यक्रम घेण्यात आले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे,पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, वैद्यकीय अधिक्षक लहू कुडमेथे, कार्याध्यक्ष एजाज अहमद, राजुरा विधानसभा यु. काँ. अध्यक्ष मंगेश गुरनुले, राजुरा तालुका यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष अशोक राव, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, धनराज चिंचोलकर, रामेश्वर ढवस ,आकाश मावलीकर, जगदीश बुटले, विक्रम ठाकूर, शुभम खेडेकर, गोलू डुकरे, मारोती पाचपुते, सचिन वैद्य, शंकर तोडासे, अकिर शेख, ताज शेख, आशिष नलगे, भुपेश मेश्राम यासह युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबीरासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे कर्मचारी संजय गावित, पंकज पवार, अमोल जिद्देवार, जय पचारे, लक्ष्मीकांत गाखरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here