



by : Shankar Tadas
चंद्रपूर:- धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या सूचनेनुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व सामाजिक,शैक्षणिक संस्था, देवस्थान ट्रस्ट च्या वतीने दिनांक 4 मार्च 2023 रोजी चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा आयोजित केला आहे. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यासाठी सर्व संस्थांनी तन,मन व धनाने सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त पी के करवंदिकर मॅडम यांनी केले आहे. बल्लारशाह येथिल गुरुनानक पब्लिक स्कूल येथे आयोजित विवाह मेळावा समिती तर्फे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीला विवाह मेळावा समितीच्या अध्यक्षा सौ शोभाताई पोटदुखे,संस्था अध्यक्ष कैलाशजी खंडेलवाल,लखन सिंग चंदेल, आनंदवन वरोरा चे सुधाकर कडू , बल्लारपूर चे रामदास वाघदरकर, डॉ रजनीताई हजारे, हरविंदर सिंग धुना , सौ स्नेहा बांटीया , राजुरा चे मसूद शेख ,श्री काकडे ,कोरपना चे उत्तमराव मोहितकर, गडचांदूर चे सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी ,स्वप्नील दोन्तुलवार आदींनी हा विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या वेळी काही संस्था प्रमुखांनी सदर मेळाव्यासाठी समिती कडे नऊ लाख रुपयांचे चेक सुपूर्द करून आर्थिक योगदान दिले.
या मेळाव्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने मदत केली जात असून समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परिसरातील गोर गरीब, आत्महत्या ग्रस्त परिवारातील जोडपी, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटित, शेतकरी, मजूर ,आदिवासी समाज इत्यादीं च्या जोडप्यांना माहिती देऊन या मेळाव्याच्या माध्यमातून आपले विवाह करावे असे आवाहन शोभाताई पोटदुखे यांनी केले.
सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन गुरुनानक पब्लिक स्कुल च्या मुख्याध्यापिका यांनी स्वागत केले। प्रास्ताविक निरीक्षक श्री मडावी यांनी तर उपस्थितांचे आभार श्री उपासे यांनी मानले.
#chandrapurcharityoffice