विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी स्नेहसंमेलनाची गरज ——-प्रा विजय आकनुरवार –———–

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

-गडचांदूर—-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी त्यांच्यात असलेल्या विविध गुणांचा विकास होणे हे काळाची गरज आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आपला नावलौकिक करावा असे आवाहन प्रा विजय आकनुरवार यांनी केले ते सोनापूर येथे प्रभाकरराव मामुलकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयाने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते ते कार्यक्रमाचे उदघाटक होते तर यावेळी अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक विठ्ठल राव थिपे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकला बाई शेंदरे, सुनीताबाई जुमनाके, नागेद्र मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विठ्ठलराव थिपे यांनी शिक्षक पालक व विध्यार्थी यांच्या माध्यमातून शाळेचा विकास होतो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश लांडे यांनी केले तर संचालन अनिल पानघाटे यांनी केले आभार युवराज मशाखेत्री यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here