



लोकदर्शन 👉 राहुल खरात
आज 23 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता क्रांती स्मृतीवन बलवडी भा.येथे नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त “चला श्रमदानातून करू या, हुतात्म्यांना अभिवादन “या विशेष उपक्रमाचे आयोजन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. उमाजी ब्रिगेडच्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस येथील ऐंशीहून अधिक विद्यार्थी आणि पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलूस येथील पंचवीसहून अधिक विद्यार्थी अशा शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी, राजे उमाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सामुदायिकरित्या क्रांतीवनात श्रमदान केले.हे विद्यार्थी पलूस ते बलवडी सायकल वरुन येऊन तेवीस कि.मी. च्या सायकल प्रवासाच्या अभिवादन रॅलीत सहभागी झाले. बलवडीच्या क्रांतीस्मृती वनात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे प्रतिमा पूजन करुन नेताजींच्या स्मृतीवृक्षास आदरांजली वाहिली. यावेळी क्रांती स्मृती वनाचे निर्माते भाई संपतराव पवार, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव ,राज्य निमंत्रक कॉम्रेड मारुती शिरतोडे, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे, सोशल मीडिया प्रमुख महेश मदने, बाळासाहेब खेडकर, अशोकराव जाधव, युवा आघाडी चे विशाल शिरतोडे विक्रम शिरतोडे, वैभव शिरतोडे,कवी महादेव जाधव, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर चे हिम्मतराव मलमे,कैलास मडके विद्या कुंभार, प्रतिभा विभूते, सायली पाटील,पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल व ज्युनि.कॉलेजचे मुख्याध्यापक उत्तम करांडे,शिक्षक बाळासाहेब चोपडे सर यांच्यासह अनेक मान्यवरांचीउपस्थिती होती.यांनंतर स्मृतीवन स्वच्छता केली.भाई संपतराव पवार म्हणाले की अशा पद्धतीने जयंती साजरी करणे म्हणजे खर्याअर्थाने नेताजींना आदरांजली ठरली.ब्रिगेडचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे यांनी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक हिम्मतराव मलमे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले.