वेकोलीचा लोखंडी पुल रहदारीसाठी खुले करा ♦️भाजपा शिष्टमंडळाची मागणी

 

लोकदर्शन 👉.शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील बँक ऑफ इंडिया जवळील घुग्घुस वस्ती व वेकोली वसाहतीला जोडणारा लोखंडी पुल 30 वर्षे जुना असलेला पुल दुचाकीसाठी सुरु करण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजपा शिष्टमंडळाने वेकोली वणी क्षेत्राचे उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गुरुवार पासून दुचाकीच्या रहदारीसाठी रेल्वे प्रशासनाने हा पुल बंद केला होता त्यामुळे राजीव रतन चौकात उड्डाण पुलाचे काम सुरु असले ठिकाणी रहदारीला मोठा अडथडा निर्माण होत आहे. स्कुल बसच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी उशीर होत आहे. रुग्णवाहीका, एस टी बसेस अडकत आहे याचा रुग्णांना व प्रवाश्याना फाटका बसत आहे. एक दोन तास वाहने अडकत आहे. हा लोखंडी पुल अचानक बंद केल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या लोखंडी पुलावरून वेकोली परिसरातील नागरिक दुचाकीने घुग्घुस वस्तीत ये जा करत होते. हा पुल बंद केल्याने वेकोली परिसरातील नागरिकांना व घुग्घुस वस्तीच्या नागरिकांना राजीव रतन चौकातून जाणे येणे करावे लागत आहे.
बँक ऑफ इंडिया परिसरातील दुकानदाराच्या धंद्यावर परिणाम झाला आहे.
त्यामुळे हा लोखंडी पुल दुरुस्त करून रहदारीसाठी खुले करा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी वेकोली अधिकाऱ्यांनी तत्काळ पुलाचे निरीक्षण करून लवकरच हा पुल सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उत्तर भारतीय मोर्चाचे यवतमाळ जिल्हा प्रभारी संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी सदस्य साजन गोहने, पूजा दुर्गम, सुनील बाम, सन्नी खारकर, आकाश निभ्रड, खलील अहमद, दिनेश बांगडे, प्रवीण सोदारी, सचिन कोंडावार, तुलसीदास ढवस, ईद्रीस भाई, श्रीनिवास आरेल्ली उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here