केंद्रस्तरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव ठरली चॅम्पियन

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
केंद्र स्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनूर्ली येथे नुकत्याच संपन्न झाल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव चॅम्पियन ठरली आहेत,
प्राथमिक विभाग मुली कबड्डी मध्ये प्रथम ,प्राथमिक विभाग मुली खो-खो मध्ये प्रथम, माध्यमिक विभाग मुले कबड्डी मध्ये प्रथम ,माध्यमिक विभाग मुले खो-खो मध्ये प्रथम, समूह गायन मध्ये द्वितीय ,वैयक्तिक नक्कल मध्ये प्रथम क्रमांक, माध्यमिक विभाग मुले रिले रेस मध्ये प्रथम ,200 मीटर धावणे प्रथम, 400 मीटर धावणे प्रथम, गोळा फेक प्रथम ,थाळीफेक प्रथम ,लांब उडी प्रथम ,उंच उडी प्रथम ,प्राथमिक विभाग मुली रिलेरेस प्रथम ,100 मीटर धावणे प्रथम, 200 मीटर धावणे प्रथम ,गोळा फेक प्रथम, थाळीफेक प्रथम ,लांब उडी प्रथम, उंच उडी प्रथम क्रमांक घेऊन वडगाव शाळा जनरल चॅम्पियन ठरली आहे 2019 मध्ये सुद्धा वडगाव शाळा ही चॅम्पियन शाळा होती सर्व विजेत्या मुलींचे खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे,केंद्र प्रमुख विलास देवाळकर, यांनी करून तालुकास्तरीय साठी शुभेच्छा दिल्या आहेत, विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक सखाराम परचाके,वसंत गोरे,शिवाजी माने,सुरेश टेकाम,अनिल राठोड, काकासाहेब नागरे, नितीन जुलमे,शाळा व्यवस्थापन समिती व समस्त गावकऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here