*आई वृध्दाश्रमाला भेट देऊन क्षणभर विश्रांती ग्रुप सदस्य श्री.रामजीत गुप्ता यांचा वाढदिवस साजरा. .!*

 

लोकदर्शन कल्याण.-👉गुरुनाथ तिरपणकर)

दिनांक ०८.०३.२०२३ रोजी कल्याण मधील आई वृद्धाश्रम येथे क्षणभर विश्रांती भेट देऊन श्री. रामजीत गुप्ता यांचा वाढदिवस साजरा केला.याप्रसंगी श्री. श्रीराम वैद्य यांनी व्हिल चेअर ,स्टॅंडींग उपकरण तसेच सर्जिकल शुज या वृद्धाश्रमास त्यांनी भेट म्हणुन दिले.गुप्ता सर यांनी आजी आजोबांसाठी स्वेटर भेट म्हणुन दिले. क्षणभर विश्रांती अविरत कोणताही विश्राम न घेता समाजाचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असते.आपल्या गृपचे सदस्य श्री. श्रीराम वैद्य,रामजीत गुप्ता,एकनाथ दुदवडकर,जनहित न्युज चॅनलचे संपादक हरी अल्हाद,दिपाली पाटिल,केतन साळगावकर, राजेश पांचाळ, सतिश गुजर या सर्वांची उपस्थीती तसेच सहकार्य या उपक्रमास लाभले. श्री. श्रीराम वैद्य यांची कन्या कु.तेजश्री वैद्य ही लवकरात लवकर बरी होऊन या क्षणभर विश्रांती या ग्रुपमध्ये समावीष्ट व्हावी हिच प्रार्थना.
क्षणभर विश्रांती संस्थेच्या प्रत्येक उपक्रमास मदत करणार्‍या तसेच हितचिंतकांचे क्षणभर विश्रांती नेहमीच आभारी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here