बेलदार समाजाचा राज्यस्तरीय परिचय मेळावा उत्साहात 

By : Ajay Gayakwad

अकोला : बेलदार सेवा संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपवर युवक युवती परिचय संमेलन व संबंध वधु वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा मोतीरामजी रामचवरे सेवानिवृत्त तहसीलदार तथा उपाध्यक्ष बेलदार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथे 8 जानेवारीला दीक्षांत सभागृह डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपन्न झाला.
सदर मेळाव्याचे उद्घाटक मा. आमदार नितीन बापू देशमुख बाळापुर मतदार संघ हे होते तर संबंध परिचय पुस्तिका प्रकाशन मा. जयरामजी मुंडाले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेलदार सेवा संघ यांच्या शुभहस्ते पार पडले सदर मेळाव्याच्या स्वागताध्यक्षा मा.सौ ज्योतीताई पंडितराव सैरिसे महिला अध्यक्ष बेलदार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ह्या होत्या तर विशेष अतिथी म्हणून मा.श्री रणधीर सावरकर आमदार अकोला पूर्व मतदार संघ, तेजेद्रसिंग चव्हाण काँग्रेस सेवा दल प्रदेश, नंदाताई पाऊल झगडे प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस, जयंतभाऊ मसने माजी सभापती मनपा अकोला,बालमुकुं भिरड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला,लक्ष्मणराव चौके,महादेवराव मुंडे,संजय पांडे,रामेश्वर बघे,अनंतराव हनवते, श्रीकृष्ण बिलेवार , महादेवराव सुलताने,मुरलीधर सुलताने, किरणताई पाथरे, नंदाताई बिलेवार,प्रकाश मुंडाले,गुलाबराव जमाव,रुपचंद घटे, ज्ञानेश्वर कवरे,देविदास बघे महाराज हे होते.
मेळाव्याचे उद्घाटक नितीनबापू देशमुख यांनी बोलताना सांगितले की बेलदार समाजाच्या सदैव पाठीशी राहणार.बेलदार समाजाच्या सर्व प्रश्नांना विधानसभेत न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी यांनी दिले. संबंध परिचय पुस्तिकेत500च्या वर नोंदणी झाली असून समाजाने या स्तुत्य उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन मोतीरामजी रामचवरे मेळाव्याचे अध्यक्ष यांनी केले.राज्याध्यक्ष जयराम मुंडाले यांनी बेलदार सेवा संघाच्या विविध समाजपयोगी उपक्रमावर प्रकाश टाकला असून समाजातील खेकडे प्रवृत्तीचा व त्यांना साथ देणाऱ्याचा सुद्धा खरपुस समाचार घेतला.उपस्थित सर्व मान्यवरांनी उपवर युवक युवती यांना शुभेच्छा देऊन मेळाव्यास सुद्धा शुभेच्छा दिल्या.
मेळाव्यात समाजातील नवनिर्वाचित सरपंच ग्राम पंचायत सदस्य तथा समाजातील गुणवंतांचा , तसेच समाजाला योगदान देणाऱ्यांचा सत्कार यावेळी व्यासपीठावर करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनंदा बेलदार व संदीप रामचवरे , एड. पवन मेहंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप बाजरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार कैलास सुलताने यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील रामचवरे,निलेश बिलेवार,श्याम कुणबीथोप दिनेश पांडे,मुरलीधर बघे,पंडितराव सैरिसे,हरीश रामचवरे,मंगेश थोप,राजू बगे, रघुनाथ सुलताने,अनिल भाऊ मुंडे ॔अमोल मेहेंगे,अमोल बगळे, नितीन मेहेंगे, प्रमोद मुंडे,सतीश भोंगारे,भगवान पाखरे, योगेश कवरे,विलास बघे,संजय सैरिसे,रविंद्र रावणचवरे,परमेश्वर बजर यांनी प्रयत्न केले.यावेळी सर्व राज्यभरातून नव्हे तर मध्य प्रदेश मधून सुद्धा समाज बांधव संमेलनाला हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

#beldarsamaj #akolaprogram #ajaygayakwad #malegaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here