अंबुजा फाउंडेशनतर्फे शेतकरी मेळावा

By : Kishor Shende
गडचांदूर : अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही, उत्तम कापूस प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून गटप्रमुखांचा शेतकरी मेळावा आवाळपूर येथे 4 जानेवारी रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाचे महत्व. गटप्रमुखांचे कार्य व त्यांचे महत्व, जैविक व सेंद्रिय शेती, मृदेची काळजी घेणे, माती परीक्षण व सेंद्रिय कर्ब वाढविणे, पाणी व्यवस्थापन, Low cast drip irrigation सिस्टिम, EM सोलुशन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवाळपूरच्या सरपंच प्रियंकाताई दिवे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतशील शेतकरी अंकुश धाबेकर, ‘लोकदर्शन’ पोर्टलचे संपादक शंकर तडस, बाळकृष्ण आंबटकर होते. त्यांनी शेतकऱ्यांपुढील समस्या तसेच त्यावर करावयाचे उपाय यावर मार्गदर्शन केले. गट प्रमुख शेतकरी तसेच प्रक्षेत्र अधिकारी दत्त्ता उपरे, अनिल पेंदोर, मीनाक्षी मंडल, सचिन आसुटकर, किशोर शेंडे, अरविंद बावणे उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *