लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय, इंदिरा जिनिंग राजुरा येथे महिला काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्याताई चांदेकर, माजी सभापती कुंदाताई जेनेकर, निर्मला ताई कुळमेथे, धनराज चिंचोलकर, शुभांगीताई खामनकर, मंगलाताई हांडे , पुनम गिरसावळे, कामीना ऊईके, वर्षा कानकाटे, कविता मोरे, योगिता मटाले, बनकर ताई यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.