नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल साहिल वाटकरचा सत्कार.

By : Mohan Bharti

छत्रपती क्रीडा अॅकाडमी क्रीडा संकुल राजुरा द्वारा कार्यक्रमाचे आयोजन.

राजुरा:–राजुरा येथील श्री. छत्रपती क्रीडा अॅकाडमी अंतर्गत प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी साहील वाटकर यांची नेमणूक भारतीय सैन्यामध्ये झाल्याबद्दल छत्रपती क्रीडा अॅकाडमीच्या वतीने तालुका क्रीडा संकुल राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तर यानिमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, साहिल सारख्या विद्यार्थ्यांपासून नव खेळाडू विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नावलौकिक प्राप्त केले पाहिजे. आता तालुका क्रीडा संकुल हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने येथे येथे आनखी अनेक क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास प्रारंभ झाला आहे. याचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांनी अवश्य करून घ्यावा.
या प्रसंगी छत्रपती क्रीडा अॅकाडमीचे संचालक व मुख्य प्रशिक्षक पाशा शेख, सचिव योगिता मटाले, गणेश लोणारे, जैन वाटेकर यासह अनेक खेळाडू व क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *