भटके-विमुक्त जाती-जमातीसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करा- महेश गिरी

 

  • *नागपूर* – गेल्या एक वर्षापासून जगभर थैमान घातलेल्या कोरोणा ने अनेक लोक मरत आहेत व अनेक कुटुंब आपल्या घरातील कर्ता पुरुष गमावत आहे आता कोरोणाने भारतात तसेच राज्यातही थैमान घातले आहे त्यावर सरकारने लाॅकडाऊन सुद्धा लावलाय ते सगळं बर आहे पण अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांना रोजगार गमवावा लागला आहे भटके-विमुक्त जमातीची लोक रोजच्या कामावर पोट भरतात त्यामुळे त्यांचावर खुपच हलाखिची परीस्थिती ओढवलेली आहे अशा परिस्थितीत शासनाने त्यांना तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करावी व जमातीची अनेक कुटुंब आपली भटकंती करून उदर निर्वाह करत असतात पण लाॅकडाऊन ने तेही करण्यात अडथळा आणला त्यामुळे या भटके-विमुक्त जमातीवर आता उपासमारीची वेळ आली आहे
    तरी मुख्यमंत्री साहेब यांनी याची तात्काळ दखल घेऊन भटके-विमुक्त समाजाला उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येकी 5 (पाच) हजार रुपये महिना दयावा.तसेच भटके-विमुक्त जमातीला स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करावा ,अशी मागणी भटके-विमुक्त हक्क परीषदेचे विदर्भ प्रमुख, गोस्वामी समाज महासभा नागपूर चे कार्याध्यक्ष श्री महेश गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे
लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *