जीव वाचवणे महत्वाचे आहे की रिपोर्ट तयार करणे

0
132

लोकदर्शन प्रतिनिधि 👉 रंगनाथ देशमुख
आजचा प्रत्यक्ष अनुभव ओबीसी समाजाचे गडचांदूर येथील सक्रिय कार्यकर्ते रविभाऊ शेंडे यांची अचानक प्रकृती बिघडली ऑक्सीजन लेवल चेक केले असता 87 च्या खाली प्रमाणात दाखवत होते, त्यांना खोकल्याचा त्रास सुद्धा आहे ,

संबंधित विषयात गडचांदूर आरोग्य केंद्रातील डॉक्टरशी बोलणी करून त्यांना होली फॅमिली येथे भरती करण्याविषयी विनंती केली असता होली फॅमिली मध्ये रवि शेंडे यांना ऑक्सीजन लावण्यासाठी विनंती केली पण आधी रिपोर्ट तयार करून आणा मगच आम्ही ऑक्सिजन लावू अशाप्रकारे तेथील नर्सने उत्तर दिले त्या वेळेस पुन्हा डॉक्टर साहेबांशी बोलणे केले असता त्यांना तात्काळ पुन्हा गडचांदूर आरोग्य केंद्रात घेऊन या असे सांगण्यात आले त्याप्रमाणे पुन्हा रवी शेंडे यांना

येजा करण्याचे हेलपाटे करणे गरजेचे आहे का?
सदर प्रकरण गांभीर्य लक्षात घेता अजूनही गडचांदूर ची परिस्थिती जैसे थेच आहे या मुजोर नेत्यांनी व प्रशासनाने अजून काहीच हालचाली यावर केलेल्या नाहीत जर एखाद्या पेशंटला ऑक्सिजन लेव्हल कमी झाली त्याला योग्य वेळी योग्य तो उपचार मिळाला नाही त्यात कमी जास्त काही जर झाले याला जिम्मेदार कोण???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here