आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने होणार आॅक्सिजन प्लांटची निर्मीती.

राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथे प्रत्येकी ३० आॅक्सिजन बेड व आॅक्सिजन प्लांट ची सुविधा.

By : Mohan Bharti

राजुरा  :– चंद्रपूर जिल्ह्य़ात प्रत्येक तालुका स्तरावरील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावने नागरिकांची गैरसोय होत होती याची दखल घेत नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध व्हावा यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी यांना तालुका स्तरावर कोरोना विषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथे प्रत्येकी ३० आॅक्सिजन बेड व आॅक्सिजन प्लांट निर्माण करण्याचे कार्य युध्द स्तरावर सुरू केली आहे.
यामुळे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने क्षेत्रातील ग्रामीण जनतेला कोरोनाच्या या संकट काळात उपचारासाठी इतरत्र न भटकता स्थानिक पातळीवर आॅक्सिजनयुक्त बेडसह उपचार करण्यात येईल. तसेच आॅक्सिजन प्लांट पुर्णपणे कार्यान्वित होताच स्थानिक रुग्णांना मुबलक प्रमाणात आॅक्सिजन उपलब्ध होण्यास मदत होईल. चंद्रपूर जिल्ह्य़ात तालुका स्तरावर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता येथे उपलब्ध असलेली आरोग्य सेवा तोकडी पडत होती, रूग्णांचे मोठे हाल होते, कोरोना रूग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने मृत्युचे प्रमाणही वाढत चालले होते. कित्येक गंभीर रूग्णाना वेळीच आॅक्सिजन व उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत होते. ही परिस्थीती आटोक्यात आनण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात आॅक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक परिसरातील रूग्णांना सोईचे होईल अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून स्थानिक पातळीवर कोरोना रुग्णांना आता आॅक्सिजन युक्त बेड व आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *