राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा उपक्रम.

0
153

By : Mohan Bharti

राजुरा :  राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पोळी – भाजी व मसाले भात वितरण करण्यात आले. एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत राजुरा महिला काँग्रेसच्या सदस्यांनी आपुलकीच्या नात्याने कोरोना काळामध्ये कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ही मदत केली आहे.  या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, तालुकाध्यक्षा कविता उपरे, जि प सदस्य मेघाताई नलगे, शहर उपाध्यक्षा संगीता मोहुर्ले, वैद्यकीय अधिक्ष डॉ. लहू कुलमेथे, इंदिरा नगर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री मडावी, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, रेखा बोढे यासह महिला काँग्रेसच्या सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here