वालुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने माळी गल्ली येथे १०० नागरीकांची कोरोना चाचणी

0
206

——-
लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी
वालुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने येथील माळी गल्लीतील शंभर नागरीकांची आरटिपिसिआर कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोणा तपासणीसाठी येथील नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.यावेळी कोरोना चाचणीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालण करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे गणेश उबाळे(प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी),सदावर्ते(औषध निर्माण अधिकारी),एम. एम. बरे (आरोग्य सेविका),वाय. जि.दुरुतकर, के.एस. वाटुरे,आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. हि कोरोना तपासणी चाचणी यशस्वी करण्यासाठी नागेश साडेगावकर ,राजेश साडेगावकर, संदिप सोनवणे, गोपाळ थोरात, नारायण आष्टकर, अंजाराम सोनवणे,अंगनवाडि शिक्षिका शकुंतला घाटुळ,सेविका आशामती मिसळ व संजयभाऊ साडेगावकर मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here