लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर —
हिंदू समाजाला नविन दिशा व सामाजिक चेतना देण्याच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, गडचांदूर मंडळाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, पी.डब्ल्यू.डी. ऑफिसजवळ, कन्यका मंदिर रोड, हनुमान मंदिर ग्राउंड, गडचांदूर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून अयोध्येचे श्री. सुलिलजी शास्त्री महाराज तर प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांताचे प्रांत प्रचारक श्री. गणेशजी शेटे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनामध्ये हिंदू समाजातील जात-पात व भेदभाव नष्ट करून सांस्कृतिक जतन, सामाजिक ऐक्य आणि सामुदायिक विकासावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपूर्ण हिंदू समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे, आपल्या परंपरा व संस्कृतीचे संरक्षण करावे, तसेच भावी पिढीसाठी सशक्त समाजनिर्मितीचा संकल्प करावा, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
या भव्य कार्यक्रमास नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.





