Home
Home महाराष्‍ट्र मुखेडचे गजानन कोलमकर यांची राष्ट्रीय कुम्हार महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुखेडचे गजानन कोलमकर यांची राष्ट्रीय कुम्हार महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुखेड : (राजाराम गुरगुलवाड)
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व गजानन व्यंकटराव कोलमकर यांची रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय कुम्हार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
प्रजापती समाजाच्या विकास प्रवासात समाजसेवेचे कार्य, वचनबद्धता, करुणा आणि सर्वोत्तम आदर्श लक्षात घेऊन गजानन कोलमकर हे महासभेच्या या महत्त्वाच्या पदाचीही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील आणि राष्ट्रीय कुंभार महासभेचे उच्च उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करून राष्ट्रीय प्रजापती समाजाच्या विकासगाथेतील शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या आधारे समाजाला चांगले नेतृत्व देतील या विश्वासाने गजानन व्यंकटराव कोलमकर यांची राष्ट्रीय कुम्हार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी २०२५ ते २०२८ या ३ वर्षांसाठी निवड करून राष्ट्रीय कुम्हार महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष- दीपचंद प्रजापती, राष्ट्रीय मुख्यमहासचिव- डुंगरमल प्रजापत, राष्ट्रीय कार्यकारणी अध्यक्ष- सुग्रीव पंडित, राष्ट्रीय मुख्य संरक्षण- वीरचंदभाई एस.प्रजापती यांच्या वतीने रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र गजानन कोलमकर यांना देण्यात आले.
गजानन कोलमकर हे अखिल भारतीय प्रजापती कुभंकार संघाचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष होते तसेच ते सध्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नियोजन समिती महाराष्ट्र जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य, दलित पिछडा वर्ग डीएसपी महाराष्ट्र दल चे उपाध्यक्ष, नांदेड जिल्हा मॅरेज ब्युरो कुंभार समाज महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, रेल यात्री एकता मंजदुर संघाचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष तसेच गजानन महाराज मंदिर संस्थान मुखेड राज्य कार्यकारणी सदस्य या सर्व जबाबदाऱ्या पाडतच ते संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या सी.आय.डी. न्युज या चॅनलच्या माध्यमातून पत्रकारीतेच्या क्षेत्रातही कार्य करीत आहेत.
वरील पदावर कार्य करीत असतांनाच गजानन कोलमकर यांनी भारत फॅसिलिटी सर्व्हिसेसच्या माध्यमातून हाऊसकिपींगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत ; परंतु स्वतःच्या प्रपंचामध्ये व्यस्त न राहता ते समाज सेवेला प्राधान्य देऊन ते फक्त आपल्या समाजातीलच नव्हे तर कोणत्याही अनयायग्रस्त समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवून न्याय देण्यामध्ये सदैव व्यस्त राहतात त्यांच्या ठायी असलेल्या एका निर्भीड व प्रामाणिक समाज सेवकाच्या गुणाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय कुम्हार महासभेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल गजानन कोलमकर यांना संबंध महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here