लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर –
भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, विश्व गौरव श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर भाजप मंडळाच्या वतीने स्थानीय सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय देवराव दादा भोंगळे यांचे जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक 17/09/2025 रोजी दुपारी 01.00 वाजता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस केक कापून व त्यांना शुभेच्छा देऊन मोठ्या गाजावाजात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी कोरपणा भाजप मंडळाचे अध्यक्ष श्री संजय मुसळे, कोरपणा भाजपचे महामंत्री श्री सतीश उपलंचीवार, गडचांदूर शहर मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद डोहे, पंचायत समिती कोरपनाच्या माजी उपसभापती व भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ स्मिता चिताडे, चंद्रपूर जिल्हा महिला भाजपच्या महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ विजया डोहे, चंद्रपूर जिल्हा भाजपा विमुक्त जाती सेलचे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण, आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता भाजप सेवा पंधरवडा संयोजक श्री सतीश बेतावार,सहसंयोजक, श्री हरीश घोरे,श्री महेश घरोटे, श्री रोहन काकडे,श्री योगेश बांदुरकर व प्रसिद्धी प्रमुख श्री कैलास कंठाळे यांनी केले.
वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी कोरपना मंडळ ओबीसी सेल चे अध्यक्षा श्री अशोक झाडे, महिला आघाडी अध्यक्ष सौ शितल धोटे, महामंत्री सौ उमा कंठाळे,सौ नमिता विश्वास, सौ रंजना मडावी, सौ विना मुद्दलवार,श्री सुरेश मेश्राम सर,श्री दत्ता शेरे,कोषाध्यक्ष श्री शंकर आपूरकर,श्री धर्मेंद्र सिंग, श्री अरविंद कोरे,श्री महालिंग कंठाळे,श्री गणपत बुरडकर, इंजि श्री विठ्ठल धांडे,श्री निखिल भोंगळे,श्री विनोद इंगळे,श्री जयंता भोंगळे, शेख रसूल भाई,गणेश आदे, गोलू इखारे, सचिन माली,तानाजी देशमुख,धर्मराज वाघमारे,सतीश आत्राम,देविदास पेंदोर, जगन कापसे, किसन चव्हाण,दिवाकर धनवलकर आदी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





