Home
Home Breaking News . महात्मा गांधी कॉलेजात गडचांदूर येथे रोजगार मेळावा यशस्वी; १३२ युवक युवतीची...

. महात्मा गांधी कॉलेजात गडचांदूर येथे रोजगार मेळावा यशस्वी; १३२ युवक युवतीची निवड

लोकदर्शन👉मोहन भारती

तालुक्यातील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

४१६ उमेदवारांचा सहभाग – १३२ जणांची निवड

या मेळाव्यात एकूण ४१६ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. त्यापैकी १३२ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली. परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण नऊ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला.

सहभागी कंपन्या व उपलब्ध पदे

ओमेंट वेस्ट प्रा. लि., चंद्रपूर – ५७ पदे

साई वर्धा पॉवर लि., वरोरा – १५ पदे

जेपी असोसिएट्स अँड लॅबोरेटरीज, चंद्रपूर – २० पदे

गोपनी अँड आयर्न पॉवर लि. – १० पदे

विदर्भ क्लीक १ सोल्युशन, चंद्रपूर – २०० पदे

वैभव इंटरप्रिन्सेस, नागपूर – ६७० पदे

डिक्सन इंजिनिअरिंग प्रा. लि., नागपूर – २० पदे

एसबीआय लाईफ इन्शुरन्स, चंद्रपूर – १०० पदे

संसार सृष्टी इंडिया प्रा. लि., चंद्रपूर – ५० पदे

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विकास भोजेकर, संचालक रामचंद्र सोनपितरे, संचालक राहुल बोढे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड व सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आयोजनातील भूमिका

प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयाच्या रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पवन चटारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रामकृष्ण पटले, प्रा. चेतन वानखेडे, डॉ. अनिस खान, डॉ. शर्मा, डॉ. घोडिले, डॉ. मुन, प्रा. वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सांस्कृतिक परंपरा जपली

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here