लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
भाजपचे युवा नेते वैभव पोटे यांच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त दिनांक २६ जुलै २०२५, शनिवार रोजी, लालबहादूर शास्त्री शाळा, वॉर्ड क्र. २, गडचांदूर येथे संध्याकाळी ७ वाजता एक भव्य पक्ष प्रवेश व युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.आ. देवरावदादा भोंगळे भूषविणार आहेत.
या विशेष कार्यक्रमात गडचांदूर परिसरातील अनेक युवकांचा भाजपमध्ये भव्य पक्षप्रवेश होणार असून, युवांशी थेट संवाद साधण्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार व प्रेरणा देण्यात येणार आहे.
कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, वैभव पोटे मित्र परिवार, गडचांदूर यांच्यावतीने नागरिक व कार्यकर्त्यांना स्नेहपूर्ण निमंत्रण देण्यात आले आहे.