लोकदर्शन👉मोहन भारती
कोरपना (लोकदर्शन प्रतिनिधी) – चंद्रपूर जिल्ह्यातील स्मार्ट ग्राम बिबी येथील स्नेहा राजेंद्र काकडे हिने देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी गुवाहाटीमध्ये मास्टर ऑफ डिझाईन या प्रतिष्ठित पदव्युत्तर अभ्यासक्रमात यशस्वी प्रवेश मिळवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
स्नेहाने प्रचंड मेहनत, सातत्य आणि चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले असून, तिचा हा प्रवास अनेक युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
देशभरातून निवडक विद्यार्थ्यांचीच या कोर्ससाठी निवड केली जाते. अशा कठीण स्पर्धेतून स्नेहाने आयआयटी गुवाहाटीसारख्या संस्थेपर्यंत पोहोचून बिबी गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्नेहाच्या या यशाबद्दल गावकरी, शिक्षक, मित्रपरिवार आणि परीसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





