Home
Home Breaking News गडचांदूर गावात आमदार देवराव भोंगळे यांचा दौरा – नागरिकांच्या समस्या ऐकून दिलं...

गडचांदूर गावात आमदार देवराव भोंगळे यांचा दौरा – नागरिकांच्या समस्या ऐकून दिलं दिलासादायक आश्वासन |

| लोकदर्शन न्यूज👉मोहन भारती

गडचांदूर:25 जून
गडचांदूर गावात विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी गावात प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण परिसरात फिरून नागरिकांशी संवाद साधला. गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या समजून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न लोकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण करणारा ठरला.

या दौऱ्यात त्यांच्यासोबत विकी उरकोडे, रोहन काकडे तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गावात रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वीजपुरवठा आदी सुविधा अत्यंत दुबळ्या अवस्थेत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले.

गडचांदूरमध्ये नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा न मिळाल्याचे पाहून आमदार भोंगळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

ते म्हणाले की, “गावाच्या विकासासाठी प्रत्येकाच्या समस्या समजून घेणे हे माझे कर्तव्य आहे. मला तुमच्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत, म्हणूनच मी स्वतः येथे आलो आहे. येथील प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करेन.”

यावेळी त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकाने स्वतः भेटून आपली समस्या सांगावी असे आवाहन केले व प्रशासनाशी समन्वय साधून लवकरात लवकर विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here