लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण, दि. १६ (विठ्ठल ममताबादे): आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी मा. यू. बी. व्यंकटेशजी हे गुरुवार, १९ जून २०२५ रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि रायगड निरीक्षक मा. राजेश शर्मा, सहप्रभारी राणीताई अग्रवाल मॅडम तसेच श्रीरंग बर्गे हे ही उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर गुरुवार १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता जोमा नारायण घरत समाजमंदिर, शेलघर येथे जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी ब्लॉक/शहर अध्यक्ष, जिल्हा व ब्लॉक पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतीचे आजी-माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे:
📍 सकाळी १०.३० वाजता –
एकत्रित बैठक – जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींची उपस्थिती.
📍 दुपारी २.०० वाजता –
ब्लॉकनिहाय काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद व चर्चा. यामध्ये संबंधित ब्लॉकचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी आणि स्थानिक नेते सहभागी होतील.
या बैठकीला वेळेत आणि पूर्ण ताकदीने उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.
—
✍️ लोकदर्शन न्यूज
👉 रिपोर्टर : विठ्ठल ममताबादे, उरण