Home
Home Breaking News महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत करा सहसंचालकांना गोंडवाना यंग टीचर्स...

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरीत करा सहसंचालकांना गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे निवेदन

लोकदर्शन –👉 मोहन भारती,

राजुरा.गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा वेळेत होणे आवश्यक असताना, गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन उशिरा होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. एप्रिल 2025 चे वेतन देखील मे महिना संपत येऊनही न मिळाल्याने, गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने नागपूर येथील सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. संतोष चव्हाण यांना निवेदन सादर करून वेतन त्वरित करण्याची मागणी केली आहे.

अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी दूरध्वनीवरून सहसंचालकांशी चर्चा केली असता, काही तांत्रिक अडचणीमुळे वेतन प्रक्रिया लांबली असल्याची कबुली देण्यात आली. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसांत वेतन वितरित होईल, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.

वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे गृहकर्ज, वाहनकर्ज, व इतर आर्थिक दायित्वांवर परिणाम झाला असून त्यांचे हप्ते थकले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जीवन सुसंगत ठेवण्यासाठी वेतन वेळेवर मिळणे अत्यावश्यक असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले.

या पार्श्वभूमीवर, गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने शासन व उच्च शिक्षण विभागाकडे वेतन नियमित करण्याची मागणी केली असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here