“म्हणी म्हणजे मराठी भाषेचा आत्मा” : डॉ. राजकुमार मुसने*

लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत

विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील मराठी विभागाच्या वतीने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत ‘ *मराठी भाषेत म्हणीचे महत्व’* या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचा उद्देश विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना भाषिक संवेदनशीलता वाढविणे तसेच पारंपारिक भाषिक संपत्तीचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग कसा करावा हे स्पष्ट करणे होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. श्री. देशमुख आयक्यूएसी प्रमुख तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध चिकित्सक, नाट्य कलावंत प्रा.डॉ. राजकुमार मुसणे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मराठी म्हणी म्हणजे जनसामान्याच्या अनुभवातून जन्मलेली शहाणपणाची गुंफण आहे त्या केवळ भाषेचा भाग नसून संस्कृतीचेही दर्पण आहेत. म्हणी मराठी भाषेचा आत्मा आहे. त्यांचा उपयोग अध्यापनात केल्यास विद्यार्थ्यांना विषय समजण्यास अधिक मदत होते. तर अध्यक्ष स्थानावरून प्रा. देशमुख यांनी म्हणी म्हणजे वाक्प्रचार नाही तर त्या जनतेच्या अनुभवातून उमटलेली शहाणपणाचा ठेवा आहे. त्या भाषेला समृद्ध करतात आणि संवाद अधिक प्रभावी बनवतात. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन राऊत यांनी केले. तर आभार प्रा. गंगाधर लांडगे यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांच्या प्रेरणेतून साकारला असून, कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. तेलंग, प्रा. कदम, डॉ. दुर्योधन श्री. शिंदे, कांबळे, मेश्राम यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here