Home
Home Breaking News *विद्यार्थ्यांच्या भाषणांतून उमटला संविधान निर्माता डॉ. बाबासाहेबांचा तेजस्वी विचार*

*विद्यार्थ्यांच्या भाषणांतून उमटला संविधान निर्माता डॉ. बाबासाहेबांचा तेजस्वी विचार*

*विद्यार्थ्यांच्या भाषणांतून उमटला संविधान निर्माता डॉ. बाबासाहेबांचा तेजस्वी विचार*

लोकदर्शन जिवती 👉 प्रा. गजानन राऊत

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे *”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान”* या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठी विभाग आणि सांस्कृतीक विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य , प्रा. देशमुख, डॉ. पानघाटे, प्रा. साबळे, प्रा. तेलंग, प्रा. लांडगे, प्रा. राठोड उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या दूरदृष्टी, संघर्षशील वृत्ती आणि संविधान निर्मितीतल्या मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे विविध पैलू प्रभावी शब्दांत मांडले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या मंत्राचे वर्तमान काळातील महत्त्व विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे विशद केले. त्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान, संविधाननिर्मितीतील नेतृत्व आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या कार्याचा उल्लेख होता. या स्पर्धेत *कुमारी दिपाली बनसोडे प्रथम, काशिनाथ गायकांबळे व्दितीय तर अजय सुर्यवंशी यांनी तृतीय* क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. योगेश खेडेकर आणि डॉ. दिनेश दुर्योधन यांनी सुंदर भुमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही किती काल सुसंगत आहेत, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात घर करून गेली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन यनगंदलवार, प्रास्ताविक डॉ. गजानन राऊत यांनी तर आभार प्रा. अमीत बोरकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील प्रा. मुंडे, प्रा. कदम, प्रा. वासाडे, प्रा. मंगाम श्री. शिंदे, श्री कांबळे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here