सामाजिक समरसता गतीविधी तर्फे डॉ.आंबेडकरांना मानवंदना..

लोकदर्शन👉प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता गतीविधी तर्फे येथील मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, सामाजिक समरसता गतीविधी चे जिल्हा संयोजक डॉ. नंदकिशोर मैदळकर उपस्थित होते.

तसेच वसंतराव थोटे, गणपत सत्रे, डॉ. अशोक भालेराव, ऍड. आशिष धर्मपुरीवार, नंदू घाटे, संजय दाणेकर, अशोक पिंपळकर, गोपाल निकोडे, रामजीवन परमार, वासुदेव काळे, ऍड.विनय लिंगे, विवेक आंबेकर, विष्णू जुमडे, अरविंद कुळमेथे हे उपस्थित होते

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विद्याभारती, विश्व हिंदू परिषद, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, भारतीय मजदूर संघ, ग्राहक मंच, बजरंग दल, वनवासी कल्याण आश्रम, धर्म जागरण, अधिवक्ता परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध शाखेतर्फे स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here