Home
Home Breaking News हातनुर जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

हातनुर जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

लोकदर्शन वालुर 👉महादेव गिरी

वालुर येथुन जवळच असलेल्या हातनुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनुर येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीनिंची गावातील मुख्य रस्त्यावरुन प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक एस.जि.राठोड यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ध्वजारोहण करण्यात आले.कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.जि.राठोड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच महेंद्र गाडे, भारतीय सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कॅप्टन जे.पि.शर्मा,एक.के.महाजन, सदाशिव पौळ, देऊळगावकर, ज्ञानेश्वर कोवळे, मारोती भिसे, कॅप्टन रमेश काकडे,आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेतील विजेत्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व संगीत कलांचे प्रदर्शन करुन उपस्थितांची दाद मिळवली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालाजी आंधळे या विद्यार्थ्यांने केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंजली आंधळे या विद्यार्थ्यांनींने केले तर आभार साक्षी आंधळे या विद्यार्थ्यांनीने केले.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक आंधळे, उपाध्यक्ष पुजा सज्जन, ग्रामसेवक जयस्वाल, उपसरपंच सुधाकर रोकडे ,पो.पा.रामचंद्र पारवे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.एस.बेले,के.डि.चिंचाणे,के.व्हि.पुरनाळे,एस.सि.लघुळे,जि.एस.फुटाणे,बि.व्हि.गोल्हारे, श्रीमती व्हि.एस.मुरकेवर आदी शिक्षकवॄंदानी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here