‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लाइमेट चेंज – 2025’चे तीन दिवसीय (16 ते 18 जानेवारी) चंद्रपूर येथे आयोजन

By : Devanand Sakharkar
चंद्रपूर :

एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई च्या माध्यमातून तथा सिटी यूनिवर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक भागीदारीने सोबतच चंद्रपूर जिल्हा प्रशासन, वनविभाग कांदळवन कक्ष मँग्रोव्ह फाऊंडेशन, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर वन अकादमी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बॉम्बे नेचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी,पुणे यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथे तीन दिवसीय *इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज -२०२५* चे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आज चंद्रपूर वन अकादमी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन, चंद्रपूर महानगरपालिका चे आयुक्त विपिन पालीवाल, बल्लारपूर आवार संचालक, डॉ.राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here