कराड साहित्य संमेलन, पत्रकार मुकुंद भट,यांना जीवन गौरव पुरस्कारा ने सन्मानित करणार!

लोकदर्शनं कराड 13👉राहुल खरात

कराड चे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद शिवराम भट याना राज्यस्तरीय सावित्री बाई पत्रकार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र राज्यांमधून एका पत्रकाराला त्यांचे पत्रकारिता विश्वातील योगदान पाहून जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यापूर्वी कराडचे ज्येष्ठ लेखक डॉ विनायकराव जाधव, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री माजी प्राचार्य रेखा दीक्षित, मुंबईच्या स्मिता राजमाने, ठाण्याच्या ज्येष्ठ गजलकार निलाताई वाघमारे, नागपूरचे, डॉ रवींद्र शोभणे, पुणे येथील डी भारत सासणे, ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सातारचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ आ ह साळुंखेआदि मान्यवरांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल
यंदाचा हा सन्मान कराडचे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद भट याना लाभला आहे, त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देऊन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे याप्रसंगी नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, कराड चे ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सिद्धार्थ कुलकर्णी, नांदेड चे ज्येष्ठ लेखक डॉ घनश्याम पांचाळ, महाराष्ट्राला सुपरिचित असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मराठी साहित्य मंडळाच्या या जीवन गौरव पत्रकार भूषण पुरस्काराने साहित्य विश्वात विशेष आनंद व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here