उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात.

उद्या आ. सुभाष धोटेंच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजुऱ्यात.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ उद्या दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोज शनिवारला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा च्या भव्य पटांगणावर सकाळी ठीक ११ वाजता काँग्रेस नेते, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या जाहीर सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here