महाविकास आघाडीच्या जाहीरनाम विमोचन सोहळ्याचे राजुरा येथे थेट प्रक्षेपण : शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती.

लोकदर्शन 👉मोहन भारती

राजुरा :– महाविकास आघाडीचा जाहिरनामा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुनजी खरगे, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), आम आदमी पार्टी, व सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे या महाराष्ट्रनाम विमोचन सोहळ्याचे आनलाईन थेट प्रक्षेपण स्क्रीनवर करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे निरिक्षक खासदार किरण रेड्डी, अनुपम जी, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शिवा राव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सभापती विकास देवाळकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, साईनाथ बतकमवार, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, विलास तुमाने, निर्मला कुडमेथे, वनिता लाटेलवार, अँड. रामभाऊ देवईकर, कोमल फुसाटे, जगदीश बुटले, पंढरी चन्ने, कवडु सातपुते, भुषण बानकर, मतीन कुरेशी, अशोक राव, सय्यद साबिर, अमित आत्राम यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here